वार्ताहर /कुडाळ
माध्यमिक विद्यालय नेरुर – माड्याचीवाडी विद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त सर्प मित्र जन जागृती कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सर्पमित्र अनिल गावडे व सहकारी शुभम फाटक यांनी माड्याचीवाडी विद्यालयात वन्य जीव सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेतली. अनिल गावडे यांनी सापांच्या विषारी, निमविषारी व बिनविषारी सापांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. लोकांमध्ये सापाविषयी असलेले गैरसमज दूर केले. तसेच साप आपला मित्र कसा हे पण समजावून सांगितले. सिंधुदुर्गात आढळणाऱ्या वेगवेगळ्या ३३ सापांच्या जातीविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विद्यार्थांच्या मनात सापाविषयी असलेली भीती दूर केली. सापांचे आपल्या जीवनातील महत्व समजावून सांगितले.यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण रावण व प्रशालेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.









