आष्टा/ वार्ताहर
आष्टा येथील श्री दत्त मां†दराजवळील कस्तुरी साडी सेंटरच्या शटरची लॉकपट्टी तोडून अज्ञात चोरट्याने 6 लाख 29 हजारांच्या साड्या चोरल्या. या चोरीच्या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आष्टा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड शेजारी श्री दत्त मां†दराच्या डाव्या बाजूस कस्तुरी साडी सेंटर आहे. महेश शिवलाल माळी, (वय 52) यांनी हे साडी सेंटर सुरू केले आहे. मंगळवार 12 रोजी पहाटे तीन ते सहा च्या सुमारास अज्ञात चोरट्याने कस्तुरी साडी सेंटरच्या दुकानाच्या शटर्सचा लॉक तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्याने साडी सेंटरमधील 96,000 ऊपये किंमतीच्या एकूण 80 नऊवारी नवीन साडया, त्यामध्ये दिंडीगल, मदुराई साड्यांचा समावेश असून प्रत्येक साडीची अंदाजे सरासरी किंमत 1200 ऊपये इतकी होती.
तसेच 2,75,000 ऊपये किंमतीच्या एकूण 250 सहावारी नवीन साडया, त्यावर जरीवर्क तसेच वेगवेगळया ा†डझाईन केल्या होत्या. प्रत्येक साडीची अंदाजे सरासरी किंमत 1100 ऊपये होती. तसेच 2,40,000 ऊपये किंमतीच्या एकूण 400 काठापदराच्या नवीन सहावारी साड्या, त्यामध्ये बनारसी शालू, कांजीवरम साड्यांचा समावेश होता. प्रत्येक साडीची अंदाजे सरासरी किंमत 600 ऊपये इतकी होती. तसेच 18000 ऊपये किंमतीचे एकूण 4 रेमंड कापडाचे तागे, प्रत्येक ताग्याची अंदाजे सरासरी किंमत 4500 ऊपये आदी माल लंपास केला. चोरट्याने एकूण 6,29,000 ऊपये ा†कमतीच्या साड्या तसेच कपडे पांढऱ्या रंगाच्या ओा†मनी कारमधून चोऊन नेले.
घटनास्थळी प्रशिक्षणार्थी डीवायएसपी मनीषा कदम यांच्यासह पा†लस आ†धकारी आणि कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात कस्तुरी साडी सेंटरचे मालक महेश शिवलाल माळी यांनी फिर्याद दिली असून प्रशिक्षणार्थी डीवायएसपी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत. आष्टा पलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा नोंद केला आहे.









