वृत्तसंस्था / चेन्नई
मंगळवारी येथे झालेल्या अखिल भारतीय बुची बाबू आमंत्रित स्पर्धेत हरियाणाविरुद्धच्या सामन्यात सरफराज खानने आक्रमक खेळ करत 111 धावा फटकावल्या. फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या दिवशी मुंबईची 4 बाद 84 धावांवर झुंज सुरू होती. तेंव्हा भारतीय फलंदाजाने नियंत्रण मिळवले आणि 112 चेंडूत 9 चौकार आणि पाच षटकार ठोकून संघाचा डाव पुन्हा जिवंत ठेला. या स्पर्धेत यापूर्वी टीएनसीए इलेव्हनविरुद्ध 138 धावा काढणाऱ्या उजव्या हाताच्या फलंदाजाने 99 व्या चेंडूवर षटकार मारुन शतक पूर्ण केले. गेल्या वर्षी राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा सरफराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघातून दूर आहे आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झाली आहे.
त्याआधी मुंबईची बिनबाद 79 धावांवरुन 4 बाद 84 अशी घसरगुंडी उडाली होती. त्यांचे सलामीवीर मुशीर खान (30), दिव्यांश सक्सेना (46), प्रज्ञेश कानपिलेवार (3) आणि सूर्यांश शेडगे (1) हे सलग दुसऱ्या डावात बाद झाले. शम्स मुलानी नाबाद 50 धावांवर होते पण तनुष कोटियन 48 धावांवर बाद झाल्याने त्यांचा टप्पा चुकला. दिवसअखेर मुंबईची धावसंख्या 9 बाद 346 अशी झाली.
दरम्यान, ऋतुराज गायकवाडने 144 चेंडूत 10 चौकार आणि 4 ष्घ्टकारासह 133 धावा केल्या. ज्यामुळे महाराष्ट्राला हिमाचल प्रदेशविरुद्ध 440 धावा करता आल्या. अर्शिन कुलकर्णीने 190 चेंडूत 16 चौकार व 1 षटकारासह 146 धवा केल्या. हिमाचल प्रदेशकडून प्रिन्स ठाकुरने 144 धावांत 7 धावा काढल्या. छत्तीसगडच्या शशांक तिवारीने 5-54 धावा देवून टीएनसीए प्रेसिडेंट्स इलेव्हनचा डाव 266 धावांवर संपवला. प्रत्युत्तरात छत्त्घसगडची धावसंख्या 4-0 अशी झाली. टीएनसीए इलेव्हनने चंद्रशेखर डीटीने तीन बळी घेत प्रतिस्पर्धी संघाला झुंजवले. बंगालची 4 बाद 58 अशी अवस्था झाली आणि त्यांची धावसंख्या 145 धावांनी कमी झाली. बंगालकडून राहुल प्रसादने 4-44 अशी झाली.









