Supriya sule Saree Controversy : ‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिला पत्रकार मराठीत बोलतात तर महाराष्ट्राची संस्कृती असणारी साडी का नेसत नाहीत?असा सवाल उपस्थित केला होता.यावर चित्रा वाघ यांनी टिका केली आहे. यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण देत भाजप व चित्रा वाघ (chitra wagh) यांना टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की,मी कुणाला काहीही बोलले नाही. मी एक मत मांडलं आहे.प्रत्येकाचा तो वैयक्तिक अधिकार आहे, असंही मी त्या भाषणात सांगितलं आहे. ३५ मिनिटांचं भाषण हे १७ सेकंदाचं सांगत असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे. मी जवळपास ३५ मिनिटे भाषण केलं.माझं भाषण नीट ऐका. माझी विनंती आहे की,पूर्ण ऐकावं.थोडा वेळ पाहून ऐका त्यात मी काय म्हटलं.मी संविधानावर विश्वास ठेवणारी आहे. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे,ते आमचे विरोधक आहेत. ते आमचं काही कौतुक करणार नाहीत. त्यांनी फार टीका केली त्या त्याबद्दल काही वाटत नाही. माझी आई नेहमी सांगते निंदकाचे घर हे शेजारी असावे, ते विरोधक काम पूर्ण करत आहेत. आज टेक्नॉलाजी वाढली आहे. पण त्याचा गैर वापर होत असल्याचेही त्या म्हणाल्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









