बेळगाव : येथील सरकारी सरदार्स हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्सात झाल्या. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक एस. एस. हादिमनी होते. या कार्यक्रमाला मंजुषा अडके, एस. ए. कलकेरी, अल्ताफ जहांगीर, कविता गाणगेर, सुशीला गजेंद्रगड, आर. ए. मण्णूर आणि ए. आय. पटेल यांची उपस्थितीत होते.विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुऊवात झाली. क्रीडा शिक्षक एच. वाय. मास्तिहोळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्ही. ए. कमती व शालेय मंत्रिमंडळाने पुष्प देऊन उपस्थित शिक्षकांचा सन्मान केला.
दीपप्रज्वलन करून पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. राज्यस्तरीय क्रीडापटू कपिल तळवार आणि भरत बगाडी यांनी क्रीडा ज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. राजकुमार गुदिगोप्प याने क्रीडाशपथ देवविली. मुख्याध्यापक एस. एस. हादिमनी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विद्याश्री लोखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवानंद मरबाशेट्टी यांनी मानले. मुलांच्यात राघवेंद्र पुजारी आणि मुलींच्यात लक्ष्मी भांदुर्गे यांनी वैयक्तिक अजिंक्यपद पटकावले. क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रेणुका शिवनवर, अनुग्रह शिरोळ, तन्वीन शिरोळ, रणजीत चौगुले, शहाबुद्दीन मुल्ला, मुजफ्फर कुरगुंद आदींनी परिश्रम घेतले.









