सरवडे प्रतिनिधी
सुळंबी ता. राधानगरी येथील रवींद्र पांडुरंग पाटील (वय ५२) हे गोकुळ शिरगाव येथे स्वतःच्या वर्कशॉपमध्ये टँकर टाकीमध्ये उतरून ग्रँडरने काम करत असताना अचानक स्फोट झाला. यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पाटील यांनी गेले अनेक वर्षे दुसर्याच्या कारखान्यात काम करून मोठ्या कष्टाने गोकुळ शिरगाव येथे स्वतःचा वर्कशॉप उभारला होता. टँकरमध्ये उतरून काम करत असताना टाकीत गँस निर्माण होऊन स्फोट झाला.त्यांना गंभीर जखमी अवस्थेत कोल्हापूर येथे सिटी हाँस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.









