पणजी : टो प्लाझा येथील संस्कृती भवनामध्ये अलिकडेच सारस्वत ब्राह्मण समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते सर्व गुणवंताना गौरविण्यात आले. आताची मुले आपल्या वडिलांची आर्थिक कुवत न पहाता त्यांच्याकडे विविध महागड्या वस्तूंची मागणी करतात. ती-ती वस्तू मिळाली नाही तर आकांड तांडव करतात. अशावेळी सर्व मुलांनी समजूत दारपणे वागावे. आपल्या पालकांना विनाकारण मनस्ताप कऊ नये. असे प्रतिपादन रोहन खंवटे यानी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केले.
आपापल्या क्षेत्रामध्ये अतूलनीय अशी कामगिरी केलेल्या तीन कर्तृत्वान व्यक्तींचा श्रीफळ-स्मृतीचिन्ह-शाल देऊन असा सत्कार वरील संस्थेचे अध्यक्ष अॅङ अवधूत नायक सलत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये पर्यटनमंत्री रोहन खंवटे, प्रसिद्ध डॉ. मधूसूदन कोलवाळकर (खात्यातर्फे त्यांचा मुलगा डॉ.मिलींद कोलवाळकर यानी हा सत्कार स्विकारला.) आणि प्रसिद्ध उद्योजक अनील खंवटे यांचा समावेश होता. यावेळी अनील खंवटे यानी उपस्थित विद्यार्थ्याना मौलिक असे मार्गदर्शन केले.
प्रारंभी स्वराली मांगिरीश शेणवी मावजेकर यानी ईशस्तवन सादर केले. या सत्कार समिती कमिटीचे अध्यक्ष अॅङ सचीन देसाई यानी स्वागतपर भाषण केले. अध्यक्ष अॅङ अवधूत सलत्री यांनी प्रास्तावीक केले. सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष के.डी.भट यानीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रा.सुभाष नायक यानी रोहन खंवटे यांचा परिचय कऊन दिला. के.डी.भट यानी डॉ. मधूकर कोलवाळकर यांचा तर सूरज मंत्रवादी यानी अनील खंवटे यांचा परिचय कऊन दिला. सचिव अॅङ राजीव कोलवाळकर यानी आभार प्रदर्शन केले. दहावीच्या परिक्षेत गोव्यात प्रथम आलेला ओमकार बाळकृष्ण कामत आणि दुसरी आलेली निधी जगन्नाथ शिंक्रे यांचा यावेळी खास गौरव करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्याचे बहारदार असे निवेदन केलेल्या अमिता सलत्री यांचा अनील खवटे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. राज शिरवयकर, तेजा फेणाणी आणि तनुजा संदीप शेट्यो या ज्ञानबंधूनी पुरस्कृत केलेल्या विविध अशा बक्षिसांचे वितरणही यावेळी करण्यात आले.









