वासाचा संशय येवू नये म्हणून जागेची केली निवड : मुंबईतील व्यापारी खून प्रकरण
प्रतिनिधी/रत्नागिरी
ठाणे येथील सराफ व्यापारी किर्तीकुमार अजयराज कोठारी यांचा मृतदेह गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पऱ्या ठिकाणी का फेकण्यात आला, याची कारणे आता समोर येवू लागली आहेत. ज्या ठिकाणी मृतदेह फेकण्यात आला होता, त्या ठिकाणी चिकन सेंटरमधील कोंबड्यांची घाण टाकण्यात येत असते. या ठिकाणी मृतदेह टाकला तर त्याचा वास समजून येणार नाही, असा कयास संशयितांनी लावला होता, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आह़े.
19 सप्टेंबर रोजी रत्नागिरीत सोने-चांदीच्या व्यवसायासाठी आलेले किर्तीकुमार कोठारी यांचा शहरातील त्रिमूर्ती ज्वेलर्स दुकानात दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी त्रिमूर्ती ज्वेलर्सचे मालक भूषण सुभाष खेडेकर (42, ऱा खालची आळी रत्नागिरी), रिक्षाचालक महेश मंगलपसाद चौगुले (39, ऱा मांडवी सदानंदवाडी रत्नागिरी) व फरीद महामूद होडेकर (36, ऱा भाट्ये खोतवाडी) यांना अटक केली आह़े सध्या तीनही संशयितांना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आह़े.
हे ही वाचा : प्रतापगडावरील भवानीमातेच्या मंदिराला 362 वर्षे पूर्ण 362 मशालींनी उजळला किल्ले प्रतापगड
किर्तीकुमार कोठारी यांचा खून केल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी तीनही संशयितांनी मृतदेह एका मोठ्या गोणीमध्ये भरल़ा यानंतर रात्री दीड च्या सुमारास महेश चौगुले याच्या रिक्षात हा मृतदेह भरण्यात आला होत़ा तसेच मृतदेह आबलोलीतील जंगलमय परिसरात असलेल्या पऱ्या मध्ये संशयितांनी मृतदेह फेकून दिल़ा कोठारी यांचा खून केल्यानंतर मृतदेह फेकण्यासाठी संशयितांनी शहरापासून 65 किलोमीटरवर असलेली जागा का निवडली, या जागेसंबधी माहिती संशयितांना कशी मिळाली, आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत होत़े.
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील पऱ्या मध्ये शहरातील चिकन सेंटरमधील कोंबड्यांची घाण, इतर कचरा टाकण्यात येत असत़ो यामुळे येथे कायमच दुर्गंधी येत असत़े हीच नेमकी बाब संशयित आरोपींनी हेरल़ी या ठिकाणी मृतदेह फेकल्यास दुर्गंधी येत असल्याने कोणीही येथे जाणार नाह़ी. सतत येत असलेल्या दुर्गंधीमुळे मृतदेह कुजल्यास नेहमीच येणारी दुर्गंधी समजून दुर्लक्ष केले जाईल, अशी शक्कल संशयित आरोपींनी लढवली असावी, असे आता समोर येत आह़े.
पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये एक रिक्षाचालक असून त्याला या जागेची माहिती होत़ी त्यानेच या जागेसंबंधी अन्य दोघांनी कल्पना दिली असावी, असे बोलले जात आह़े.