ऍक्शन थ्रिलर धाटणीचा चित्रपट
टायगर श्रॉफच्या ऍक्शन थ्रिलर चित्रपटासाठी आता अभिनेत्री म्हणून सारा अली खानची निवड झाली आहे. पूजा एंटरटेनमेंटककडून निर्मित या चित्रपटात टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात टायगर अन् सारा ही नवी जोडी दिसून येणार आहे.

हा चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. याचे चित्रिकरण भारतासह अनेक युरोपीय देशांमध्ये पार पडणार आहे. हा चित्रपट कथितपणे मिशन आधारित असल्याचे समजते. टायगर श्रॉप पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱया ‘गणपत पार्ट वन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रीति सेनॉन झळकणार आहे. याचबरोबर स्क्रू ढीला आणि बडे मियां छोटे मियां या चित्रपटात तो काम करत आहे. यातील एका चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार दिसून येणार आहे.
सारा अली खान एका बायोपिकमधून झळकणार आहे. हा चित्रपट 1942 मधील भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. ए वतन या चित्रपटात ती उषा मेहता यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच लक्ष्मण उकेटा यांच्या चित्रपटात ती मुख्य भ्tमिकेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत विक्की कौशल काम करत आहे.









