चित्रपटात एकत्र दिसणार असल्याची चर्चा
सारा अली खान अन् सैफ अली खान या दोघांनीही बॉलिवूडमध्ये स्वत:ची अभिनयक्षमता दाखवून दिली आहे. आता सैफ अली खान अन् सारा यांच्या चाहत्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. पिता-लेकीची ही जोडी आता एका चित्रपटात एकत्र दिसून येणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण अलिकडेच सुरू झाले आहे.

सारा अन् सैफच्या या चित्रपटाच्या चित्रिकरणाशी निगडित छायाचित्रे समोर आली आहेत. यात सैफ हा कैद्याच्या रुपात तर सारा पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसून येते. या चित्रिकरणावेळी इब्राहिम हा देखील तेथे दिसून आल्याने तो देखील या चित्रपटाच्या निर्मितीत सामील असल्याचे मानले जात आहे.
सैफला अलिकडेच ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट वादात सापडला असून यातील सैफच्या लुकवर जोरदार ट्रोलिंग करण्यात आले आहे. तर सारा ही अलिकडेच विक्की कौशलसोबत जरा हटके जरा बचके या चित्रपटात दिसून आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी दर्शविण्यात आली आहे.









