वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय क्रिकेटमध्ये देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर डिजीटल क्रिकेटच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. याआधी तिचे वडील मुंबई इंडियन्सचे माजी कर्णधार सचिन तेंडुलकर अणि भाऊ अर्जुन तेंडुलकर यांनी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते. पण आता चक्क ग्लोबल ई-क्रिकेट प्रिमियर लीग (जीईपीएल) मधील मुंबई इंडियन्स संघाची मालकी सारा तेंडुलकरने घेतली आहे. ग्लोबल ई-क्रिकेट प्रिमियर लीग ही डिजीटल क्रिकेट स्पर्धा असून खेळांडूना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्सहित करणारा गेम आहे. ही लीग रियल क्रिकेटवर आधारित गेम असून पहिल्या मोसमात 2,00,000 तर दुसऱ्या मोसमात 9,10,000 जणांनी डाऊनलोड केला आहे. क्रिकेटवरील प्रेमापोटी आपण हा निर्णय घेतल्याचे साराने सांगितले.









