दाक्षिणात्य अभिनेत्रीची निवड झाल्याची चर्चा
अभिनेत्री सारा अली खान आणि विक्की कौशलचा चित्रपट ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ मागील काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होण्यापूर्वी याच्या कलाकारांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सारा अली खान आता विक्की कौशलसोबत या चित्रपटात दिसून येणार नाही.
चित्रपटातील मुख्य अभिनेत्री साराला बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विक्कीची नायिका म्हणून वयाने अधिक मोठी असलेल्या अभिनेत्रीची निवड करण्याचा विचार निर्मात्यांनी चालविला आहे. पटकथेत बदल करण्यात आल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
निर्मात्यांनी आता अभिनेत्री समांथा रुथ प्रभूच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे मानले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर करणार आहेत. या चित्रपटाचे निर्मितीपूर्व काम सुरू झाले आहे. या चित्रपटाची कहाणी पौराणिक पात्र अश्वत्थामावर आधारित आहे. द फॅमिली मॅन 2 मधील स्वतःच्या अभिनयाने लोकांची मने जिंकल्यावर समांथा आता अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.









