विक्रांत मैसी नायकाच्या भूमिकेत
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान स्वतःचा आगामी चित्रपट ‘गॅसलाइट’मुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिच्यासाब्sात विक्रांत मैसी आणि चित्रांगदा सिंह दिसून येणार आहे. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकणार आहे. सारा, विक्रांत, चित्रांगदाने एक व्हिडिओ शेअर करत याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

हा चित्रपट मर्डर मिस्ट्री दर्शविणारा आहे. गॅसलाइट हा चित्रपट 31 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. गॅसलाइट या चित्रपटाच्या निर्मात्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीवर प्रदर्शित होणारा साराचा हा दुसरा चित्रपट ठरणार आहे. यापूर्वी तिचा ‘अतरंगी रे’ हा चित्रपट हॉटस्टारवरच प्रदर्शित झाला होता.
सारा अली खान ही ‘गॅसलाइट’ या चित्रपटासह लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाच्या नावाची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. याचबरोबर ती ‘मर्डर मुबारक’ नावाच्या चित्रपटात स्वतःचे अभिनय कौशल्य दाखवून देणार आहे.









