1942 च्या भारत छोडो आंदोलनावर चित्रपट
स्वतःच्या अभिनयाच्या बळावर लोकांच्या मनात स्थान मिळविणारी अभिनेत्री सारा अली खान चर्चेत राहते. ती लवकरच 1942 च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित एका चित्रपटात दिसून येणार आहे. स्वातंत्र्य आंदोलनावर बेतलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कानन अय्यर करत असून सारा यात मुख्य भूमिकेत असणार आहे.
देशभक्तीने प्रेरित या चित्रपटाची निर्मिती करण जौहरच्या धर्मेटिक एंटरटेनमेंटच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम करण्यात येणार आहे.

सारा लवकरच आदित्य धरचे दिग्दर्शन असलेल्या द इम्मोर्टल अश्वत्थामा या चित्रपटात विक्की कौशलसोबत दिसून येणार आहे. हा चित्रपट महाभारतातील योद्धा अश्वत्थामावर आधारित असेल. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत आहेत. याचबरोबर ती लक्ष्मण उकेटा यांच्या चित्रपटात काम करत आहे. सारा यापूर्वी अतरंगी रे या चित्रपटात दिसून आली होती. या चित्रपटात सारा अली खानने अक्षय कुमार आणि धनुषसोबत मुख्य भूमिका साकारली होती.









