स्वातंत्र्यलढय़ात होते मोठे योगदान
अभिनेत्री सारा अली खान आता एका देशभक्तीपर चित्रपटात काम करणार आहे. करण जौहरचा चित्रपट ‘ऐ वतन..मेरे वतन’मध्ये ती दिसून येणार आहे. या चित्रपटात ती स्वातंत्र्यसेनानी ऊषा मेहता यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

सारा अली खान या भूमिकेसाठी मोठी तयार करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर हे करणार आहेत. कन्नन याचबरोबर अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांच्यासोबत अभिनव बिंद्रा यांच्या बायोपिकवरही काम करणार आहेत. परंतु ऊषा मेहता यांच्यावर आधारित चित्रपटामुळे या बायोपिकचे काम रोखण्यात आले आहे.
स्वातंत्र्यलढय़ादरम्यान ऊषा मेहता या गुप्त रेडिओ ऑपरेटर म्हणून काम करत होत्या. इंग्रजांच्या विरोधातील लढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी एक गुप्त रेडिओ सर्व्हिस ‘काँग्रेस रेडिओ’ची सुरुवात केली होती, ज्याचा स्वातंत्र्यलढय़ात मोठा लाभ झाला होता. या रेडिओ सेवेद्वारे स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यसेनानींसंबंधी सर्व माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत होती. सूरत येथे जन्मलेल्या ऊषा मेहता यांना 4 वर्षांचा तुरुंगवासही झाला होता. 1946 मध्ये त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. भारत सरकारने ऊषा मेहता यांना पद्मविभूषणने गौरविले होते. 11 ऑगस्ट 2000 रोजी त्यांचे निधन झाले होते.









