ओटवणे
|प्रतिनिधी
भालावल ग्रामपंचायतचे कर्मचारी संतोष विश्राम परब (५२) यांचे गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मूर्तिकार म्हणूनही ते परिचित होते. त्यांचे पार्थिव भालावल गावात आणल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत परब कुटुंबीयांचे सांत्वन केले. साहिल परब यांचे ते वडील तर अर्जुन परब यांचे ते भाऊ होत. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण, भावजय, पुतण्या असा परिवार आहे.









