मालवण / प्रतिनिधी
Santosh Gawde as President of Malvan Taluka Journalist Committee and Saugandraj Bandekar as Secretary!
मालवण तालुका पत्रकार समितीच्या २०२३ ते २०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी आज पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी संतोष गावडे तर सचिवपदी सौगंधराज बादेकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांनी ही निवड जाहीर केली.मालवण तालुका पत्रकार समितीची अध्यक्ष व सर्व कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेसाठी कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस निवडणूक निर्णय निरीक्षक म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, महेश सरनाईक आदी उपस्थित होते.
यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष- कृष्णा ढोलम, दत्तप्रसाद पेडणेकर, सहसचिव- संदीप बोडवे, खजिनदार- सिद्धेश आचरेकर, सदस्य- कुणाल मांजरेकर, गणेश गावकर, नितीन गावडे, प्रशांत हिंदळेकर, उदय बापर्डेकर, अमित खोत, सुधीर पडेलकर
यावेळी निवडण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीचे निवडणूक निर्णय निरीक्षक दाजी नाईक, राजेंद्र मुंबरकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.यावेळी आप्पा मालंडकर, संग्राम कासले, प्रफुल्ल देसाई, नितीन आचरेकर, शैलेश मसुरकर, अमोल गोसावी, परेश सावंत, समीर म्हाडगुत, अर्जुन बापर्डेकर, पी. के. चौकेकर, अनिल तोंडवळकर, मनोज चव्हाण, महेश कदम, महेंद्र पराडकर आदी सदस्य उपस्थित होते.









