वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतामध्ये फुटबॉल क्षेत्रात प्रति÷sची आणि जुनी म्हणून ओळखल्या जाणाऱया संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेतील यावेळी उपांत्य आणि त्यानंतर अंतिम फेरीतील सामने सौदी अरेबियामध्ये खेळविले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनने दिली आहे.
संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच काही सामने विदेशात खेळविले जात आहेत. सौदी अरेबियातील रियाध येथे किंग फहाद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे सामने 1 ते 4 मार्च दरम्यान आयोजित केले आहेत. अ. भा. फुटबॉल फेडरेशनने सौदी अरेबिया फुटबॉल फेडरेशनच्या अधिकाऱयांसमवेत चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. 1941 साली पहिल्यांदा ही राष्ट्रीय स्पर्धा भारतात सुरू करण्यात आली होती. प्रत्येक वषी सदर स्पर्धा देशातील सहा विविध ठिकाणी घेतली जाते. तसेच अंतिम सामना नेहमीच कोलकातामध्ये खेळविला जातो. संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सामने ओदिशाच्या भुवनेश्वरमध्ये खेळविले जाणार आहेत. या स्पर्धेत एकूण 12 संघांचा समावेश असून ते दोन गटात विभागण्यात आले आहेत. सदर स्पर्धा प्राथमिक गटात राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जात असून या दोन गटातील आघाडीचे दोन संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरतील.









