वृत्तसंस्था / वेलिंग्टन
इंग्लंडविरुद्ध मायदेशात होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी क्रिकेट न्यूझीलंडने सोमवारी न्यूझीलंड संघाची घोषणा केली असून या संघात मिचेल सँटनर आणि अष्टपैलू रचिन रवींद्रचे पुनरागमन झाले आहे.
न्यूझीलंडच्या वनडे संघाचे नेतृत्व सँटनरकडे सोपविले आहे. त्याचप्रमाणे अनुभवी फलंदाज केन विलियम्सनलाही या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे. ही मालिका 18 ऑक्टोबरपासून हॅगले ओव्हल येथे सुरू होणार आहे. त्यानंतर उभय संघात वनडे मालिका आयोजित केली असून ही मालिका 26 ऑक्टोबरपासून सुरू होईल. विलियम्सनचे न्यूझीलंडच्या वनडे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र बेन सिअर्सला दुखापतीमुळे ही मालिका हुकणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत नीशमची कामगिरी चांगली झाली होती. डफी, हेन्री, जेमिसन, ब्रेसवेल, फोक्स तसेच सँटनर यांच्यावर गोलंदाजांची भिस्त राहील.
न्यूझीलंड टी-20 संघ: मिचेल सँटनर (कर्णधार), ब्रेसवेल, चॅमपन, कॉनवे, डफी, फोक्स, हेन्री, जेकॉब्स, जेमिसन, डॅरियल मिचेल, नीशम, रचिन रवींद्र, रॉबिन्सन, सिफर्ट.









