रविंद्रनाथ टागोरांचे होते निवासस्थान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नोबेल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांचे निवासस्थान शांतिनिकेतनला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील करण्यात आले आहे. शांतिनिकेतनमध्येच टागोरांनी एक शतकापूर्वी विश्वभारतीची स्थापना केली होती.
युनेस्कोने रविवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करत शांतिनिकेतनला जागतिक वारसास्थळांच्या यादीत सामील केल्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील या सांस्कृतिक स्थळाला युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत सामील करविण्यासाठी भारताकडून दीर्घकाळापासून प्रयत्न केले जात होते.
काही महिन्यांपूर्वी इंटरनॅशनल कौन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्सकडून या ऐतिहासिक स्थळाला युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत सामील करण्याची शिफारस करण्यात आली होती.









