11 जवान सुरक्षेकरता असणार तैनात
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचे पुत्र संतोष मांझी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय प्लस श्रेणी सुरक्षा प्रदान करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. वाय प्लस अंतर्गत संतोष मांझी यांच्या सुरक्षेकरता 11 जवान तैनात असणार आहेत. संतोष मांझी यांना असलेल्या धोक्यासंबंधी केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून काही इनपुट्स मिळाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने संतोष मांझी यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. संतोष मांझी यांनी अलिकडेच नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मांझी यांचा हम हा पक्ष पुन्हा रालोआत सामील झाला आहे. बिहारमध्ये यापूर्वी उपेंद्र कुशवाह, मुकेश सहनी, चिराग पासवान, ऋतुराज सिन्हा यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.









