लोकसहभागातून उभारतोय पैसा, देणगी देण्याचे दत्त भक्त मंडळाचे आवाहन
संग्राम काटकर कोल्हापूर
सानेगुऊजी वसाहत परिसरातील संतोष कॉलनीत दत्त संप्रदाय वृद्धींगत करणारे हे श्री दत्त मंदिर. या मंदिर परिसरातील लोकांना एकत्र येण्यासाठी हक्काच ठिकाणही हेच दत्त मंदिर आहे. गेली 28 वर्षे अवघा परिसर दत्त दर्शनासाठी मंदिरात एकत्र येत आहे. मंदिरात गेलं की बरं वाटत अशी लोकभावनाही निर्माण झाली आहे. अशा या मंदिराचा आता जिर्णोद्धार केला जात आहे. त्यासाठी संतोष कॉलनी श्री दत्त भक्त मंडळ व परिसरातील लोकांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून पूर्वी जसे मंदिर उभारले तसे लोकसहभागातूनच त्याचा जिर्णोद्धार होणार आहे. त्यात मंदिराची लांबी-रूंदी वाढण्याबरोबर समोरील मंडप आरसीसीमध्ये बनवला जाणार आहे. त्यासाठी 10 ते 12 लाख ऊपये खर्च अपेक्षीत धरला आहे.
गेल्या दोन ते तीन दशकात संतोष कॉलनीच्या चौहोबाजूंनी महादेव मंदिर, गणपती मंदिर, तुळजा भवानी मंदिर, माऊती मंदिर, गजानन महाराज मंदिराची उभारणी झाली आहे. मात्र दत्त मंदिराची उभारणी झालेली नव्हती. कॉलनीतील अनेक रहिवाशी हे दत्त भक्त आहे तर मग दत्त मंदिर उभारण्यास काय हरकत आहे, असा विचार पुढे आला. त्यानुसार 1996 साली कॉलनीत दत्त मंदिर बांधण्यासाठी संतोष कॉलनी श्री दत्त भक्त मंडळाची स्थापना केली. कालांतराने मंदिर उभारणीसाठी मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दिनकर पाटील, उपाध्यक्ष के. आर. पाटील, नामदेव बरगे, धेंडीराम माजगावकर, विठ्ठल कुंभार, (कै.) दिलीप शिंदे, (कै.) बाबुराव बचाटे, (कै.) आनंदराव पाटील, लक्ष्मणराव काजवडेकर यांनी लोकसहभागातून पैसे उभे केले. मंदिरासाठी कॉलनीतीलच ओपन स्पेसमधील जागेची निवड केली. जागेसाठी मिळवण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. महापालिकेने दिलेल्या परवानगीनुसार कॉलनीत दत्त मंदिर उभा केले. मात्र काही कारणास्तव मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना करण्याला विलंब झाला. 2000 तुळजा भवानी मंदिर परिसरातील कृष्णात साळोखे, पांडूरंग साळोखे, आनंदा साळोखे या तिघा भावांनी पुढाकार घेऊन दिलेल्या दत्तात्रयांच्या मूर्तीची मंदिरात प्रतिष्ठापना केली. याच कालावधीत मंदिराची धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे नोंदणीही केली. मंदिरासमोर धार्मिक कार्यासाठी पत्र्याचा मोठा मंडप केला. यामध्ये दत्त जयंतीसह धार्मिक कार्यक्रम केले जाऊ लागले. मंदिरातील दत्तमूर्तीच्या दर्शनासाठी तर संतोष कॉलनीसह आजूबाजूच्या 10 ते 15 कॉलनींमधील लोकही मंदिरात येऊ लागले. त्यामुळे मंदिरात दिगंबरा…दिगंबराचा नामजप घुमू लागला. मंदिरात रोज जमणाऱ्या ज्येष्ठांसाठी तर हे मंदिर विरंगुळा केंद्रच बनले. प्रत्येक गुऊवारी रात्री साडे आठ वाजता आणि दररोज सकाळी सव्वा नऊ वाजता दत्तमूर्तीची आरती होते. अखंडीत सुऊ असलेल्या या आरतीसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवस वाटून घेतले आहेत.
सध्या जे मंदिर आहे ते आकाराने छोटे असल्याने दत्त भक्त मंडळाने अलिकडेच मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरवून लवकरच कामाला सुऊवात केली जाणार आहे. मंदिर आरसीसीमध्ये बांधताना गाभाऱ्याची लांबी-ऊंदी वाढवली जाणार आहे. मंदिरासमोरील मंडपही आरसीसीमध्येच बनवून त्यात आकर्षक फरशीही बसवण्यात येणार आहे. मंदिरात एकाच वेळी अनेकांना बसता यावे यासाठी बैठक व्यवस्थाही करण्यात येणार आहे. हे सर्व बांधकाम डिसेंबर महिन्यातील दत्त जयंती सोहळा करण्याचे मंडळाने नियोजन केले आहे.
एक वीट श्रद्धेची आणि एक वीट सहकार्याची ही टॅग लाईन घेऊन दत्त भक्त मंडळ दत्त मंदिर जिर्णोद्धारासाठी लोकसहभागातून पैसे व वस्तू स्वऊपात देणगी स्वीकारत आहे. ज्या भक्तांना देणगी द्यायची आहे त्यांनी सानेगुरूजी वसाहत परिसरातील दत्त मंदिराशी संपर्क साधावा. आपली देणगी मंदिर जिर्णोद्धाराला गती आणणार आहे. मदत देऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी अधिक माहितीसाठी हेमंत कांबळे व (8657174567) व महेश चव्हाण (8087320511) यांच्याशी संपर्क साधावा.
राजेंद्र माजगावकर (अध्यक्ष : संतोष कॉलनी श्री दत्त भक्त मंडळ)