प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी देहू इथल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झाले.
पंतप्रधानांचे स्वागत खास वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र आनंदमय वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमानंतर मुंबईत राजभवनातल्या जलभूषण इमारतीचं आणि क्रांतीगाथा या भूमिगत दालनाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी व्यासपीठावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्तित होते.








