पेडणे : संत समाज पेडणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या तपोभूमी कुंडई संचालित संत समागम कार्यक्रम नानेरवाडा पेडणे येथील यजमान सुनील बाबल गडेकर यांच्या गृहस्थाश्रमी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी संत समाजाच्या वतीने बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .यजमान सुनील गडेकर यांच्या वतीने सर्व मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ,यावेळी विविध असे कार्यक्रम साजरे करण्यात आले . श्री व सौ गडेकर यांच्या तर्फे पूजन करण्यात आले .त्यानंतर प्रार्थना , आरत्या , श्लोक पठण , बाल वृद्धी कुमार पांडुरंग तुळसकर , मंजिरी सावळ देसाई ,प्रतीक्षा सावळ देसाई यांनी माऊती स्तोत्र ,श्लोक भजन कार्यक्रम सादर केले.
ड़ प्रशांत मालवणकर यांच्याकडून गजर साजरा करण्यात आला ,संत समाजाचे पुरोहित व उदघाता अजय गडेकर यांच्या कडून अध्यात्मिक प्रबोधन करण्यात आले , त्याच प्रमाणे धर्म प्रचारक संजय कळंगुटकर यांच्याकडून ब्रह्मज्ञान ,स्वयं ब्रह्म ,आपण सर्वांना आजच्या युगात ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी सर्वांनी साधना, ध्यान ,आराधना ,आणि संत समागम मध्ये भाग घेऊन गुरूंमाऊलींच्या सानिध्यात राहण्यास पसंती द्यावी ,त्यामुळे आपण सर्वांचं कल्याण निश्चितच आहे ,असे सर्व बंधू भगिनींना मार्गदर्शन केले . त्यामुळे सर्वजण श्रीरामा प्रमाणे गुणी विचार , बुद्धी आत्मसात करून संत समागमाच्या कार्यक्रमांमध्ये सदोदित सेवा केली पाहिजे ,असे धर्मप्रचारक संजय कळंगुटकर म्हणाले . संत समागम मध्ये खास उपस्थिती पार्सेचे धर्मप्रचारक संजीवन साळगावकर ,मांद्रे झोनचे क्षेत्रीय प्रमुख महेशजी गोडकर ,संत समाज वजरीचे धर्मप्रचार व संस्कृत आचार्य दयानंद पालयेकर ,मोपाचे अय्यर ,वेद विभूषी प्रतीक्षा सावळ देसाई ,मंजिरी सावळ देसाई ,जेष्ठ गुऊबंधू रामकृष्ण सावळ देसाई ,राजेश सावळ देसाई , योगाचार्य प्रशांत नागवेकर ,किशोर किनळेकर, संती नागवेकर ,शशिकांत नागवेकर, अंकुर गडेकर ,देवाशिष गडेकर, बाबल गडेकर, पार्वती कवठणकर बंधू व भगिनी उपस्थित होते, सर्व कार्यक्रमाचे निवेदन प्रतीक्षा सावळ देसाई हिने केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत नार्वेकर यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली.









