प्रतिनिधी/ बेळगाव
कॅम्प येथील संत रोहिदास युवक मंडळाच्यावतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचे अध्यक्ष भीमराव पवार होते. प्रारंभी गणपतराव काळे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, मंत्रपठण व दोहे पठण झाले. विद्यार्थिनी पूर्विता हिने गीत सादर केले.
संदीप सन्नक्की यांनी संत रोहिदासांच्या जीवन आणि कार्याची माहिती दिली. अध्यक्ष अरुण काळे, कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष सुधीर तुपेकर, हिरालाल चव्हाण, संतोष होंगल, किशोर पवार, अप्पू चव्हाण, देवेंद्र धारवाडकर, संजय चौगुले आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसाद वितरण झाले. शहरासह उपनगरांतील बंधू-भगिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला.









