सीबीएसई साऊथ झोन स्केटिंग स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
यमकनमर्डी येथे झालेल्या बी. बी. हंजी इंटरनॅशनल स्कूल आयोजित सीबीएसई साऊथ झोन रोलर स्केटिंग स्पर्धेत 4 सुवर्ण, 5 रौप्य, 1 कांस्यपदक अशी एकूण 10 पदके पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे.
शिवगंगा स्केटिंग रिंकवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत सुमारे 1300 स्केटिंगपटूंनी सहभाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे : स्पीड स्केटिंग- अवनीश कामण्णावर 2 सुवर्ण, सत्यम पाटील 1 सुवर्ण, अनघा जोशी 1 सुवर्ण, आर्या कदम 2 रौप्य, सौरभ साळोखे 1 रौप्य, सार्थक चव्हाण 2 रौप्य, भव्य पाटील 1 कांस्य. या स्केटिंगपटूंना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, क्लिफ्टन बेर्रेटो यांचे मार्गदर्शन लाभत आहे.









