बेळगाव : टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर स्वाध्याय विद्या मंदिर शाळा आयोजित श्री छत्रपती शिवाजी क्लस्टर अनगोळ ,शहापूर, टिळकवाडी मुलाच्या गटात संत मीराने जी.जी. चिटनीस संघाचा मुलींच्या गटात संत मीराने बालिका आदर्शचा पराभव करून संत मीराने दुहेरी मुकुट संपादन केला. प्राथमिक मुलांच्या अंतिम सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 8-3 असा पराभव केला. संत मीरा संघाच्या उत्कर्ष कणसेने 4 गोल, महमंद फरहाने 2 गोल प्रथमेश कुडतुरकर,व हॅरिस यांनी प्रत्येकी 1 गोल केला ,जी जी चिटणीस शाळेतर्फे साकेत यरमाळकरने 2 ,आर्या कंग्राळकरने 1 गोल केला.
मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने जी जी चिटणीस शाळेचा 6-0 असा पराभव केला. संत मीरा संघाच्या पूर्वा बडमंजी, प्रणिती बडमंजी यांनी प्रत्येकी 2, आरोही देसाई, व ईश्वरी कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम लढतीत संत मीरा शाळेने गतविजेत्या बालिका आदर्श शाळेचा अटीतटीच्या लढतीत 5-4 असा पराभव करित स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.संत मीरातर्फे आरोही देसाईने 2 गोल, पूर्वी बडमंजी, प्रणिती बडमंजी, ईश्वरी कुलकर्णी यांनी प्रत्येकी 1 गोल केले. बालिका आदर्श शाळेतर्फे श्रेया मजुकर, श्रेया खन्नुरकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
प्रमुख पाहुणे सिल्वीया डिलीमा, प्रवीण पाटील, शिवकुमार, बापू देसाई, पार्लेकर या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन व विजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, याप्रसंगी क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर ,उमेश मजुकर, सी. आर. पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील, रामलिंग परिट ,अर्जुन भेकणे ,देवेंद्र कुडची उपस्थित होते.









