क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
मध्यप्रदेश येथे विद्याभारती अखिल भारतीय संघटना आयोजित राष्ट्रीयस्तरावरील प्राथमिक मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने विजेतेपद पटकाविल.s तर माध्यमिक मुलींच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
मध्यप्रदेश शिवपुरी येथील सरस्वती विद्यापीठ आवासीय विद्यालय शाळेच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत प्राथमिक मुलींच्या गटात उपांत्यपूर्व लढतील संत मीरा शाळेने उत्तरप्रदेशचा 5-0 असा पराभव केला. संत मीरातर्फे मेघा कलखांबकरने 3 गोल, वर्षा परीट, मनस्वी चतुर प्रत्येकी 1 गोल केला. उपांत्य फेरीत संत मीराने राजस्थानचा 6-3 असा पराभव केला. संत मीरातर्फे ऐश्वर्या पत्तार, मेघा कलखांबकर यांनी प्रत्येकी 2 गोल. तर वर्षा परीट मनस्वी चतुर यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
अंतिम लढतीत संत मीरा शाळेने तमिळनाडू दक्षिणक्षेत्र संघाचा 6-2 असा पराभव करित या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. संत मीरातर्फे ऐश्वर्या पत्तारने 3 गोल तर मेघा कलखांबकर मनस्वी चतुर वर्षा परीट यांनी प्रत्येकी 1 गोल केला. या विजेत्या संघात ऐश्वर्या पत्तार, वर्षा परीट, सुहाणी गुडेकर, मेघा कलखांबकर, हिंदवी शिंदे, प्रणाली मोदगेकर, स्वाती फडनाडी, ऋतिका हलगेकर, भावना बेर्डे, मनस्वी चतुर, सान्वी कुलकर्णी या खेळाडूंचा समावेश आहे.
माध्यमिक मुलींच्या गटात उपांत्य सामन्यात राजस्थानने संतमीरा दक्षिण मध्य क्षेत्राचा 11-8 असा पराभव केला. संत मीराच्या समीक्षा बुद्रुकने 8 गोल केले.
तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत संत मीराने तामिळनाडूचा 6-4 असा पराभव करीत कांस्यपदक पटकाविले. संतमीरातर्फे समीक्षा बुद्रुकने 6 गोल केले. या संघात भावना कौजलगी, आदिती पाटील, अमृता करेगार, रितुषा जवरूचे, चैत्रादास, वृत्तिका बांदेकर, दिशा जोशी, सृष्टी तडकोड, समीक्षा बुद्रुक, प्रणिता मजुकर, साक्षी पाटील, स्नेहा धनवडे यांचा संघात समावेश असून या संघाला प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, क्रीडाशिक्षक सी. आर. पाटील, मयुरी पिंगट यांचे मार्गदर्शन लाभत आहे. परमेश्वर हेगडे, सहसचिव सुजाता दप्तरदार, माधव पुणेकर, संतमीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, ऋतुजा जाधव इतर शिक्षक वर्गाने संघाचे अभिनंदन केले. प्राथमिक मुलींचा संघ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे होणाऱ्या 67 व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.









