विद्याभारती फुटबॉल स्पर्धा : संत मीराच्या अब्दुल मुल्लाचे भक्कम गोलरक्षण
बेळगाव :संत मीरा गणेशपुर हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक मुलांच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत अनगोळच्या संतमीरा संघाने दुहेरी मुकूट पटकाविले. तर खानापूरच्या शांतीनिकेतन स्कूलला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. गणेशपुररोड येथील गुड शेफर्ड शाळेचे आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर प्राथमिक गटातील मुलांच्या पहिल्या उपांत्य सामन्यात शांतिनिकेतन पब्लिक स्कूलने स्वामी विवेकानंद खानापूर शाळेचा 1-0 असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात संतमीरा अनगोळ शाळेने गजानन भातकांडे शाळेचा 3-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत संतमीरा अनगोळ संघाने शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरचा 1–0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. संत मीरातर्फे कर्णधार फरहान नदाफ यांनी एकमेव गोल केला.
माध्यमिक मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संतमीरा संघाने स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरचा 2-0 असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात शांतीनिकेतन पब्लिक स्कूलने गजाननराव भातकांडे शाळेचा 2-0 असा पराभव केला. शांतीनिकेतन तर्फे आराध्याने दोन गोल केले. अंतिम लढतीत संतमीरा अनगोळ संघाने शांतिनिकेतन पब्लिक शाळेचा टायब्रेकवर 3-2 असा निसटता पराभव केला. संतमीरातर्फे साईराज कुराळे, अथर्व गावडे, अब्दुल मुल्ला, तर शांतीनिकेतन तर्फे रितेश देसाई, रोहन गावकर यांनी गोल केले. संतमीरा शाळेच्या विजयात अब्दुल मुल्ला मोलाचा वाटा असून त्यांने शांतिनिकेतनचे 3 गोल आडविले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे महापौर मंगेश पवार संत मीरा गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर, सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, मुख्याध्यापिका आरती पाटील, विद्याभारती जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ नाईक, विनायक ग्रामोउपाध्ये ,विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख सी.आर.पाटील यांच्यावतीने विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी श्वेता पाटील आशा भुजबळ, शिवकुमार सुतार, यश पाटील अपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणनु मानस नायक, आदित्य सानी, सोहम ताशिलदार, प्रणव देसाई, ओमकार गावडे, हर्ष रेडेकर यांनी काम पाहिले.









