बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा इंग्रजी स्कूलने तिहेरी मुकुट, तर बालिका आदर्शने विजेतेपद पटकाविले. आता हे संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. प्राथमिक मुलांच्या अंतिम लढतीत संत मीराने डिव्हाईन मर्सीचा 6-2 असा पराभव केला. संतमीरातर्फे उत्कर्ष कणसेने 5 गोल, फरान नदाफने 1 गोल, तर पराभूत संघातर्फे तेजस समर्थने 1 गोल केला. मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीराने डिव्हाईन मर्सीचा 7-0 असा एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकाविले.
संत मीराच्या पूर्वी बडमंजीने 4 गोल तर खुषी हिरेमठ, प्रणिती बडमंजी आरोही देसाई यांनी प्रत्येकी 1 गोल केला. माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीराने सेंट जोसेफ संतीबस्तवाडचा 5-1 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. संत मीरा संघाच्या सोहेल विजापूर, अनिऊद्ध हलगेकर, संचित धामणेकर, श्रेयश किल्लेकर यांनी प्रत्येकी 1 गोल केले. सेट जोसेफतर्फे विठ्ठलने 1 गोल केला. मुलींच्या गटातील अंतिम लढतीत बालिका आदर्शने डिव्हाईन मर्सीचा 5-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. विजयी संघाच्या सेजलने 3 तर श्रावणीने 2 गोल केले.
स्पर्धेच्या बक्षिल समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी जुनेद पटेल, रमेश सिंगद, भरत बळ्ळारी, प्रवीण पाटील, नागराज भगवंतण्णावर, सी. आर. पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून देवेंद्र कुडची, अनिल जनगौडा, बापु देसाई, मानस नायक, शिवकुमार सुतार, यश पाटील, रामलिंग परीट, जयसिंग धनाजी, उमेश बेळगुंदकर, उमेश मजुकर, प्रकाश बजंत्री यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बसवंत पाटील, लक्ष्मी पेडणेकर, समिक्षा बुद्रुक, मनस्वी चतुर मेघा कलखांबकर हिंदवी शिंदे, स्नेहा कुलकर्णी, श्रेया लाटुकर. विनया दिवटे यांनी परिश्र्रम घेतले.









