प्रतिनिधी /बेळगाव
त् विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत राज्यस्तरीय विद्याभारती कबड्डी व योगा स्पर्धेसाठी बेळगांवच्या संत संघ बंगळूर व विजापूरला रवाना झाले आहेत.
बंगळूर श्रीरामपूर येथील संदीपानी विद्याभवन शाळेच्या सभागृहात शनिवार ता 10 रोजी व रविवार ता 11 रोजी होणाऱया राज्य व क्षेत्रीय योगा स्पर्धेसाठी संत मीरा शाळेचे पार्थ थोरात, यश चव्हाण ,मयंक डेगोंळे, स्वयंम काजोळकर, रोहित मुचंडी, श्रेय चंदन, श्रेयस देशमुख गौरव बिंदिया, प्रथमेश गुरव, श्रेयस देशनूर, गणेश पाटील, अमन रायबागकर, तर मुलींच्या संघात गौतमी कंग्राळकर, वैष्णवी दौडवाड, सान्वी पाटील, हेमंती नागराजू. सानिया मुचंडी, राजलक्ष्मी थोरात ,हे खेळाडू क्रीडाशिक्षिका अनुराधा पुरी, नीरज सावंत यांच्यासमवेत बंगळूरला रवाना झाले आहेत,
विजापूर येथील अभ्युदोय पदवीपूर्व महाविद्यालयच्या मैदानावर शनिवार दि. 10 सप्टेंबर रोजी होणाऱया विद्याभारती राज्य व क्षेत्रीय कबड्डी स्पर्धेसाठी संत मीरा शाळेच्या प्राथमिक मुला-मुलींचाच्या संघात आकांक्षा बोकमूरकर, ऐश्वर्या पत्तार, मेघा कलखांबकर, विजयालक्ष्मी नांदे, प्रिती कडोलकर, सृष्टी कुंभार, ऐश्वर्या शहापुरमठ, श्रेया लाटुकर, चरन्या मंजुनाथ, श्रेया कामाण्णाचे, अमृता करेगार, सृष्टी येळ्ळुरकर, तर मुलांच्या संघात रोहन करेगार, आदित्य बाळेकुंद्री, प्रथम मठद, राकेश मलतवाडी, शौर्य सरदेसाई, सर्वेश देवरे. प्रितम पत्तार, अथर्व येळ्ळूरकर, वरूण कोळी, सुजल परब, आदित्य जाधव, तर संघासमवेत क्रीडाशिक्षक गौतम तेजम, मयुरी पिंगट व्यवस्थापक म्हणून बसवंत पाटील रवाना झाले आहे. वरील संघाला शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.









