बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलचे प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींचे फुटबॉल संघ कुऊक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या विद्याभारती अखिल भारतीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी रवाना झाले. बेळगावात नुकत्याच झालेल्या क्षेत्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा स्कूलच्या प्राथमिक मुला-मुली व माध्यमिक मुलींच्या संघाने बेंगळूर व आंध्र प्रदेशचा पराभव करीत विजेतेपद पटकावित राष्ट्रीय स्पर्धेसाठी ते पात्र ठरले आहेत. दि. 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान श्री भागवत माध्यमिक विद्यालय कुऊक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या 69 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीराचा संघ दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहे.
प्राथमिक मुलींच्या संघात कर्णधार निधिशा दळवी, उपकर्णधार समीक्षा खन्नुरकर, अद्विता दळवी, आदिती सुरतेकर, कनिष्का हिरेमठ, कृतिका हिरेमठ, हषिता गवळी, अनन्या रायबागकर, कल्याणी हलगेकर, समुध्दी कोकाटे, समुध्दी घोरपडे, प्रणिता बडमंजी, स्वाती फडनाडी तर, माध्यमिक मुलींच्या संघात कर्णधार दीपा बिडी, उपकर्णधार हर्षदा जाधव, सृष्टी सातेरी, श्रेया लाटुकर, मोनिता रियांग, दीपिका रिंयांग, अमृता मालशोय, श्र्रद्धा भंडारगाळी, संचिता सुतार, सिंचना तिगडी, श्रुती यळ्ळूरकर, हिंदवी शिंदे यांचा समावेश आहे.
प्राथमिक मुलांच्या संघात कर्णधार फरहान नदाफ, प्रथमेश कुडतुरकर, मोहम्मद हरीस, वंश कामु, दर्शन कुडची, सचिन पुरोहित, मिथलेश आमरोळी, स्पर्श वेर्णेकर, शुभम गौतम, केविन जेटाजी, प्रतिक कोकणे, आयमन अली मुल्ला, सार्थक पाटील, आनंद पाटील, ओमकार गावडे यांचा संघात समावेश असून या संघासमवेत प्रशिक्षक शिवकुमार सुतार, यश पाटील, शिक्षिका धनश्री पाटील, प्रेमा मेलीनमनी, आनंद कुलकर्णी रवाना झाले आहेत. या संघाला विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, उपाध्यक्ष रामनाथ नाईक, सी आर. पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









