बेळगाव : खेळाबरोबर अभ्यासही नियमित केल्यास यश मिळते. यासाठी क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू पूजा संताजी यांनी केले. त्या संत मीरा शाळेच्या माध्यमिक विभागाच्या क्रीडास्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. अनगोळ येथील येथील संत मीरा शाळेच्या माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळाडू पूजा संताजी, वेगा हेल्मेटचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवानंद बिडी, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका नीलिमा गाडगीळ, चित्रा देशपांडे, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार ,उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते क्रीडाध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सरस्वती ओमकार भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन पाहुण्यांचे हस्ते झाले. राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू सान्वी पाटीलने पाहुण्यांचा परिचय स्वागत तर अश्विन जायण्णाचे, साक्षी पाटील, समीक्षा बुद्रुक, साईकिरण शिंदे, गणेश माळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी सहभागी खेळाडूंना शपथ देण्यात आली. शालेय क्रीडाशिक्षक एस. आर. पाटील व शिवकुमार सुतार, यश पाटील, अभिषेक गिरीगौडर, सुजल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा स्पर्धांना शाळेच्या मैदानावर प्रारंभ झाला. याप्रसंगी शालेय शिक्षिका गीता वरपे, आशा कुलकर्णी, सविता पाटणकर, रूपाली जोशींसह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलिना पठाण तर साईकिरण शिंदे यांने आभार मानले.









