विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : देवेंद्र जिनगौंडा स्कूल शिंदोळी आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी संत मीरा, शांतिनिकेतन स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे बेळगावचे उपमहापौर आनंद चव्हाण, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, स्पर्धा आयोजन देवेंद्र जिंनगौडा शाळेचे मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख सी. आर. पाटील, स्पर्धा सचिव प्रशांत वाडकर या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी गंगा सानीकोप्प यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, प्रशांत वाडकर यांनी उपस्थित पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपमहापौर आनंद चव्हाण, परमेश्वर हेगडे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यानंतर पाहुण्यांचे हस्ते श्रीफळ, खेळाडूंची ओळख व चेंडू लाथाडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पंच आदित्य सानी, स्वयंम ताशीलदार, प्रणव देसाई, स्वरूप हलगेकर क्रीडाशिक्षक उदय, ओमकार गावडे ,गणपत गावडे, आशा भुजबळ, श्वेता पाटील, यश पाटील शिवकुमार सुतार, सिद्धार्थ वर्मा, अभिषेक गिरीगौडर ,पी एस कुरबेट, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगा सानीकोप्प तर सी. आर. पाटील यांनी आभार मानले.
प्राथमिक गटात पहिल्या उपांत्य सामन्यात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल शाळेने संत मीरा गणेशपुर शाळेचा 2-0 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. तर माध्यमिक गटात पहिल्या सामन्यात स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरने देवेंद्र जीनगौंडा शाळेचा 2-0 असा पराभव करीत विजय संपादन केला,तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा अनगोळ संघाने संत मीरा गणेशपुर शाळेचा 4-0 असा एकतर्फी पराभव करीत अंतिम करीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूरने स्वामी विवेकानंद स्कूल खानापूरचा अटीतटीच्या लढतीत 2-0 असा पराभव करीत अंतिम करीत प्रवेश केला.









