बेळगाव : गणेशपूर रोड येथील गुडशेफर्ड शाळेच्या आवारातील टर्फ मैदानावर विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती राज्यस्तरीय आंतरशालेय मुला-मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, आरव्हीके, बेंगळूर, विवेकानंद पदवीपूर्व कॉलेज मंगळूर यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील मुलांच्या अंतिम लढतील संत मीरा बेळगावने आरव्हीके स्कूल बेंगळूरचा 3-0 असा पराभव केला. मुलींच्या गटातील अंतिम लढतीतही संत मीरा बेळगावने आरव्हीके स्कूल बेंगळूरचा 3-0 असा पराभव केला, विजयी संघाचा कर्णधार निधीशा दळवीने दोन गोल, समीक्षा खन्नूरकरने 1 गोल केला,
माध्यमिक मुलांच्या गटात आरव्हीके बेंगळूरने संत मीरा बेळगांवचा 1-0 असा निसटता पराभव करत विजेतेपद मिळविले. मुलींच्या गटात संत मीरा बेळगावने आरव्हीके स्कूल मंगळूरचा 2-0 असा पराभव केला विजयी संघातील दीपिका व दीपा बिडीने प्रत्येकी 1 गोल केला. 19 वर्षाखालील मुलांच्या गटात विवेकानंद कॉलेज मंगळूरने शांतिनिकेतन पदवीपूर्व कॉलेज खानापूरचा 1-0 असा पराभव केला. वरील विजेते संघ सप्टेंबर महिन्यात कुऊक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत दक्षिण मध्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक शिक्षण खात्याचे जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, माजी शरीरसौष्ठवपट्टू प्रणय शेट्टी, मलगौडा, अनिल पत्तार, व्हा.r सी. अडकी, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, यश पाटील, अमृता पेटकर, पौर्णिमा या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच म्हणून मानस नायक, आदित्य सानी, स्वरूप हलगेकर, प्रणव देसाई, चैत्रा इमोजी, बसवंत पाटील, लक्ष्मी पेडणेकर, रेखा मलतवाडी, सोहेल विजापुरे, समर्थ पनारी, अनिऊद्ध हलगेकर, संचित धामणेकर, मनस्वी चतुर, ऋतिका हलगेकर यांनी कामगिरी बजावली.









