बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या हँडबॉल स्पर्धेत संत मीरा स्कूलने तिहेरी मुकुट पटकाविले. अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत बालिका आदर्श शाळेने विजेतेपद पटकाविले. प्राथमिक गटातील मुलींच्या अंतिम सामन्यात संत मीराने लिटल स्कॉलर शाळेचा 7-0 असा पराभव केला. विजयी संघाच्या पूर्वी बडमंजीने 3, प्रणिता बडमंजीने 2 गोल, अमृता बजंत्रीने 1 तर ईश्वरी कुलकर्णीने 1 गोल केला. मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीराने सेंटपॉलचा 6-0 पराभव करीत विजेतेपद पटकाविले.उत्कर्ष कणसेने हॅट्ट्रिकसह 4 गोल तर फरार नदाफने 2 गोल केले. माध्यमिक मुलींच्या गटात पहिल्या अंतिम सामन्यात बालिका आदर्शने सेंट झेवियर्सचा 8-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकावले.
विजय संघाच्या शिवानी शेलारने 4, ऋतुजाने 2 तर श्र्रद्धा व समृद्धीने प्रत्येकी 1 गोल केला. मुलांच्या अंतिम सामन्यात संत मीराने सेंट झेवियर्सचा 4-0 असा पराभव केला. विजय संघाच्या सोहेल विजापूरने 2 गोल, अनिऊद्ध हलगेकर, संचित धामणेकर यांनी प्रत्येकी 1 गोल केला. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे संत मीराच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, स्पर्धा सचिव सी. आर. पाटील, गेगरी मेंडीस, उमेश बेळगुंदकर, चेस्टर रोजारियो या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. पंच जयसिंग धनाजी, ज्युलेट फर्नांडिस, उमेश मजुकर, शिवकुमार सुतार, देवेंद्र कुडची, माऊती मगदूम, संजय केळगिरे,अनिल जनगौडा,महावीर जनगौडा, शिला सानिकोप, रामलिंग परीट, यश पाटील आदी उपस्थित होते.









