बेळगाव : गणेशपुररोड येथील गुडस शेफर्ड शाळेच्या टर्फ मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय प्राथमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीराने दुहेरी मुकुट तर सेंट जोसेफ, सेंट पॉल्स संघानी विजेतेपद पटकाविले. प्राथमिक मुलांच्या गटात पहिल्या अंतिम सामन्यात सेंट पॉल्सने भरतेशचा 3-0 असा पराभव केला. सेंट पॉल्सच्या आराध्या नाकाडीने 2 गोल, नवीन पी.ने 1 गोल केला.माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीराने बलाढ्य सेंट पॉल्सचा सडनडेथवर 6-5 असा पराभव करत विजेतेपद पटकाविले. संत मीरा संघाच्या अब्दुल मुल्लाने 2, अनिऊद्ध हलगेकर, साईराज कुराळे, ओम घुमे, तर सेंटपॉलतर्फे सुमित, श्रेयस, ईशान यांनी प्रत्येकी 1 गोल केले.
मुलींच्या गटातील अंतिम लढतीत सेंट जोसेफने डीपी स्कूलचा 2-0 असा पराभव केला. सेंट जोसेफतर्फे लेलेस्टा मदुराई व रोहिणी कांबळे यांनी प्रत्येकी 1 गोल केला. प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात संत मीराने सेंट जोसेफचा टारब्रेकरवर 2-0 असा पराभव केला. संतमीराच्या हर्षदा गवळी, निधीशा दळवी यांनी गोल केले. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पीईओ जहिदा पटेल, के. आर. शेट्टी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी, पवन कांबळे, कॅम्प विभाग माध्यमिक संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतण्णावर, टिळकवाडी माध्यमिक विभाग संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, अॅन्थोनी डिसोजा, सी. आर. पाटील, बापू देसाई, अल्लाबक्ष बेपारी, प्रशांत देवदानम, मार्गरेट डिसोजा, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पंच किरण तरळेकर, यश सुतार, मानस नायक, माऊती मगदूम, शिवकुमार सुतार, हर्ष रेडेकरसह विविध शाळेचे क्रीडाशिक्षक, प्रशिक्षक उपस्थित होते.









