बेळगाव : गोमटेश विद्यापीठ स्कूल मजगाव आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, डी. पी. स्कूलने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे के. आर. शेट्टी फौंडेशनचे अध्यक्ष प्रणय शेट्टी, शिवाजी कॉलनी फुटबॉल क्लबचे सचिव पवन कांबळे, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सिल्वया डिलीमा, मुख्याध्यापक महांतेश हिरेमठ, प्रदीप पाटील, गोपाळ खांडे, दयानंद बजंत्री, उमेश मजुकर, सी. आर. पाटील, कौशीक पाटील, यश सुतार, किरण तारळेकर, जयसिंग धनाजी, शिवकुमार सुतार या मान्यवरांनी खेळाडूंची ओळख करवून घेत फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले. 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात डी. पी.ने एम. व्ही. हेरवाडकरचा 2-0 असा पराभव केला, दुसऱ्या उपांत्य सामन्यात संत मीरा स्कूलला मुक्तांगण स्कूलचा संघ गैरहजर राहिल्याने विजयी घोषित केले.
Previous Articleलिंगराज संघाकडे सक्षम फुटबॉल चषक
Next Article फुटबॉल स्पर्धेत संत मीरा विजेता, चिटणीस उपविजेता
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









