सातार्डा / प्रतिनिधी
सातोसे येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुरुवार 18 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . सकाळी दहा वाजता माऊली मंदिरामध्ये श्री सत्यनारायण महापूजा, २वाजता आरती , १ वाजता महाप्रसाद ,सायंकाळी ४ ते ५ या वेळात ग्रामस्थांचे भजन, तर सायंकाळी ५ ते ६ वाजता महिलांच्या फुगड्या होणार आहेत. सायंकाळी ७ वाजता अमृतनाथ दशावतार मंडळ म्हापण – वेंगुर्ले यांचा संत कान्होपात्रा नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सातोसे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे करण्यात आले आहे.









