अध्याय अठरावा
शास्त्रात माणसाच्या आयुष्याचे चार भाग कल्पीले असून प्रत्येक भागाला आश्रम म्हणतात. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशी त्या चार आश्रमांची नावे आहेत पैकी ब्रह्मचर्याश्रम व गृहस्थाश्रमाची माहिती भगवंतांनी सतराव्या अध्यायात सविस्तर दिली. वानप्रस्थाश्रमाबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, वनात जाऊन व्रतस्थ राहून साधना करणे हे वनप्रस्थाश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे हे साध्य करण्यासाठी सात्विक आहार असणे महत्वाचे आहे. तसेच स्वभाव निरिच्छ व निरपेक्ष हवा. वनात होणाऱया गैरसोयी विनातक्रार सहन करायला हव्यात. थोडक्मयात गृहस्थाश्रमात उपभोगलेल्या वस्तुंचा, सुखसोयींचा संपूर्ण त्याग करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर असं झालं तर बरं होईल असा विचार करण्यास मनाई असते. जे जसं घडेल तसं स्वीकारायची तयारी असावी. याला देह प्रारब्धावर टाकणे असं म्हणतात. सध्याच्या काळात अशा स्वरूपाचा वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याच्या फंदात कुणीच पडणार नाही कारण ते फार कठीण व्रत आहे हे भगवंतांच्या कथनावरून लगेच लक्षात येते. स्वतःचं राहतं घर सोडून वनात राहायला जाण्याची कल्पना सहजी पचनी पडणारी नाही हे जरी खरे असले तरी भगवंतांच्या सांगण्यावर साकल्याने विचार करण्याची गरज आहे. तो असा, मनुष्य जरी वृद्धापकाळात स्वतःच्या घरात रहात असला तरी त्याने भगवंतांच्या सांगण्यानुसार व्रतस्थ राहण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी मनामध्ये दृढ शांती धारण करावी. कामक्रोधाचा त्याग करावा. फलाहार करावा.
दररोज ताजी फळे खावीत. कोणत्याही प्रकारचा संग्रह करू नये. निश्चयाने प्रारब्धावरच भरवसा ठेवून राहावे. दुसऱयाने दिलेले दान कधीही घेऊ नये. सतत ईश्वर स्मरणात राहून अंतर्बाह्य निष्पाप व्हावे म्हणजे सत्यज्ञान प्राप्त होऊन मनुष्य ईश्वराच्या निजस्वरूपाला पोहोचतो. अशा प्रकारे वानप्रस्थाचा उद्धार होतो. यात एक पथ्य म्हणजे स्वतःच्या घरात का होईना पण आपण व्रतस्थ रहात आहोत याचा थोडासासुद्धा अहंकार होऊन उपयोग नाही. असे घडले तरच आत्मज्ञान व वैराग्य उत्पन्न होते कारण अहंकारातून देहबुद्धी जोपासली जाते व ती माणसाच्या उद्धाराला मोठीच आडकाठी ठरते. आता वानप्रस्थाश्रमी वनात राहात असून जो अत्यंत विरक्त होईल, त्याने पुढे कसे वागावे, ते भगवान सांगत आहेत. ते म्हणाले, वानप्रस्थाश्रमामध्ये योग्य अनु÷ान घडल्यामुळे अत्यंत वैराग्य उत्पन्न झाले आणि इंद्रलोक, चंद्रलोक व सत्यलोक हेही ज्याला नरकाप्रमाणे वाटू लागण्याइतके निस्सीम वैराग्य ज्याच्या ठिकाणी उत्पन्न झाले, त्याने विधीयुक्त रीतीने सर्वस्वाचा त्याग करून संन्यास स्वीकारावा. यथाविधि आठ श्राद्धे करून व प्राजापत्य नावाची इष्टि करून मज भगवंताप्रीत्यर्थ यज्ञ करून ऋत्वीजाला सर्वस्वदान करावे. मुख्यत्वेकरून मूर्त जो अग्नि, त्याची आपल्या हृदयात स्थापना करून, निःशेष आशा सोडून देऊन संन्यासदीक्षा ग्रहण करून निरिच्छ व्हावे.
संन्यास ग्रहण करतेवेळी हजारो विघ्ने उत्पन्न होतात, ती सारी पायाखाली तुडवून टाकून संन्यासग्रहण करावे.
मनुष्याने संन्यास घेतला म्हणजे तो काही ह्यापुढे आम्हांस बली देणार नाही, इतकेच नव्हे तर उलट आमच्या डोक्मयावर पाय देऊन ब्रह्मपदही घेऊ लागेल, हे मनात येऊन देव नेहमी त्याला आडकाठी करू पाहतात. अशा वेळी खरोखर वैराग्याच्या जोरावर विघ्नांना लाथा हाणून साऱया देवांना बाजूस सारून अवश्य संन्यासग्रहण करावे. असा वैराग्याने संपन्न व विवेकज्ञानाने अत्यंत श्रे÷ असलेला पुरुष विधिपूर्वक संन्यास घेऊन वरि÷ म्हणजे पूज्य होऊन राहतो. अशाप्रकारे संन्यास ग्रहण केल्यानंतर त्याने विधिपूर्वक कसे वागावे ते संन्यासाचे स्वधर्मलक्षण स्वतः नारायण सांगत आहेत तो देहमात्र राहिलेला दिसतो. बाकी त्याने पूर्वीच सर्वस्वाचा त्याग केलेला असतो. जो गुरुवाक्मयश्रवणाबरोबर सहज ब्रह्मस्वरूप होऊन जातो आणि देहबुद्धीचा ठसा उडून जाऊन ज्याच्या कर्माचाही फासा तुटतो त्याने शास्त्रविधीप्रमाणे वागणेसवरणेची गोष्टसुद्धा कधी बोलू नये.
क्रमशः