गुळ हा उष्ण पदार्थ असल्यामुळे थंडीच्या दिवसात गुळ आणि गुळाचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.म्हणूनच गुळापासून अनेक पदार्थ केले जातात. आज आपण अशीच एक गुळाची पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य :
गव्हाचं पीठ
गुळ
पाणी
खसखस
तूप
ड्रायफ्रुट्स
वेलदोडे पूड
कृती
सर्वप्रथम कोमट पाण्यामध्ये अर्धा तास गुळ भिजवून ठेवा.त्याच पाण्यात वेलदोड्याची पूड घालावी.यांनतर बाउलमध्ये गव्हाचं पीठ आणि थोडं तूप एकत्र करून घ्या. आणि तयार मिश्रण गुळाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्या. (यावेळी संपूर्ण गुळ विरघळलेलं पाणी घ्यावं.)यानंतर तयार पीठाचे गोळे घेऊन हलक्या हाताने जाडसर लाटून घ्या.लाटताना त्यावर थोडी खसखस वरून टाका. तयार पोळी तव्यावर दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून व्यवस्थित भाजून घ्या.आणि गरमागरम गुळपोळी तुपासोबत सर्व्ह करा.
Previous ArticleRatnagiri : मित्रांनेच केला मित्राचा खून; कारण अद्याप अस्पष्ट
Next Article लोणावळ्यात स्विमिंगपूलमध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू









