जत, प्रतिनिधी
Sangli Rain Update : जत तालुक्याच्या पूर्व भागातील 30 ते 35 गावातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला आणि त्यांच्या जीवनात हरितक्रांती घडविणारा संख मध्यम प्रकल्प सलग चौथ्या वर्षी ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
संख मध्यम प्रकल्प 2018 पासून दरवर्षी भरला जात आहे. यंदाही सुरवातीचा मान्सून, अवकाळी आणि परतीचा पाऊस या भागात चांगला झाला आहे. शिवाय तुबची योजनेचे ओव्हरफ्लो पाणी देखील मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने हा तलाव शंभर टक्के भरला आहे. गेल्या चार दिवसात संख परिसरात सतत मोठा पाऊस पडतो आहे. त्यानंतर रविवारी सकाळी हा प्रकल्प सलग चौथ्या वर्षी ओसंडून वाहत आहे. येथील मनमोहक दृश्य टिपण्यासाठी अनेक लोक या मध्यम प्रकल्पावर येत आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








