बेळगाव : टिळकवाडी येथील समर्थ व्यायाम मंदीर सभागृहात घेण्यात आलेल्या समर्थ श्री टॉप टेन व्यायाम शाळा मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धेत संकेत सुरूतेकर समर्थ श्री चा मानकरी ठरला आहे. यावेळी ताराबाई हरिश्चंद्र पै. समर्थ व्यायाम मंदीरचे माजी शरीरसौष्ठवपटू भारत श्री भारत श्रेष्ठ किताबाचे मानकरी कै. राम पाटिल, यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी बोलताना नारायण पै म्हणाले की नवनवीन स्पर्धेकानी युवा शरीरसौष्ठवपटूं तयार व्हावेत, यासाठी सर्वतोपरी मदत करू व समर्थ व्यायाम मंदीरच्या वतीने पूर्ण सहकार्य देऊ असे सांगितले.व्यायाम शाळेचे माजी व्यायामपटू, देणगीदारांचा स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे नारायण पै, अॅड.डॉ.एस बी शेख, आनंदराव गोगटे, अमर अकनोजी,राजु अजगावकर, किरण कावळे उपस्थित होते.
यावेळी या स्पर्धेला जवळपास 25 हून अधिक शरीरसौष्ठवपटू स्पर्धकांनी सहभाग घेतला या सर्वांनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन केले व सर्वांचे लक्ष वेधून घेतले यातुन टॉपटेन स्पर्धकांची निवड करण्यात आले, यामध्ये संकेत सुरूतेकर यांनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन केले आणि समर्थ श्री-2025 हा किताब फटकाविला तर द्वितीय भुषण सावंत, तृतीय निलेश नाईक, चौथा श्रवण चतुर, पाचवा जयदेव क्षीरसागर, साहवा इंद्रजित डोवल, सातवा रोहीत झिंगरूचे, आठवा सचिन जोरले, नववा प्रशांत जांबोटकर,तर दहावा भावेश ताहशीलदार, यांनी पटकावला. यावेळी सर्व विजेत्यांना मान्यावरांच्या हस्ते चषक, प्रमाण पत्र, व रोख रक्कम देण्यात आली. तर माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी समर्थ श्री किताबाच्या मानकरीला रोख रक्कम देऊन गौरविले. पंच म्हणून किरण कावळे, राजु मर्वे, शिवाजी माने, किरण पोटे, क्रितेश कावळे तर स्टेज मार्शल संदीप बडवाणाचे यांनी काम पाहिले.









