नवी दिल्ली
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघातील सर्वात जुना खेळाडू असून आयपीएल-2026 मध्ये तोच संघाचे नेतृत्त्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रॉयल्सच्या जवळच्या सूत्रांनी याबाबत पुष्टी केली असून ऑफ सीझनमधून बाहेर पडण्याच्या अटकळांना फेटाळून लावण्यात आले आहेत. त्यानुसार, सॅमसन संघात कायम राहणार असून आयपीएल-2026 च्या हंगामासाठी कर्णधारपदी राहील. आरआरने सध्या सॅमसन किंवा त्यांच्या कोणत्याही खेळाडूची देवाणघेवाण न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सॅमसन हा रॉयल्स सेट-अपचा एक भाग आहे आणि संघाचा निर्विवाद कर्णधार आहे, असे सूत्रांनी सांगितले. सॅमसनला इतर फ्रँचायझींमध्ये विशेषत: एम. एस. धोनीचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये जाण्याशी संबंधित अटकळ होती. तसेच फ्रँचायझीसाठी खराब हंगामानंतर तो कर्णधारपदासाठी पात्र ठरेल, अशी अफवा पसरली होती. सॅमसन 2013 पासून राजस्थान रॉयल्सशी संबंधित आहे आणि तो संघाचा एक आधारस्तंभ आहे.
2016 आणि 2017 मध्ये तो काही काळासाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता पॅपिटल्स) मध्ये गेला. जेव्हा आरआरवर दोन हंगामांसाठी बंदी घालण्यात आली होती. परंतु अलिकडच्या वर्षांत तो संघाचे नेतृत्व करण्यासाठी परतला. 2025 चा आयपीएल हंगाम सॅमसन आणि रॉयल्स दोघांसाठीही निराशाजनक होता. बोटाच्या दुखापतीमुळे तो पहिल्या तीन सामन्यांमधून बाहेर राहिला. त्या दरम्यान रियान परागने संघाचे नेतृत्व केले. सॅमसनने नऊ सामन्यांसाठी पुनरागमन केले. त्याने फक्त एका अर्धशतकासह 285 धावा केल्या. दरम्यान, आरआरने क्रमवारीत नववे स्थान मिळवले. त्याचे भविष्य आता स्पष्ट झाल्यामुळे, 2026 च्या हंगामासाठी सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स कसे पुन्हा संघटित होतात यावर लक्ष केंद्रित केले आहे.









