वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आणि भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन गेल्या महिन्यात बोटावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यातून सावरून सोमवारी संघात दाखल झाला. सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ 23 मार्च रोजी हैदराबादच्या उप्पल स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविऊद्ध होणाऱ्या सामन्याने इंडियन प्रीमियर लीग हंगामाची सुऊवात करेल.
सॅमसनचे बेंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये शस्त्रक्रियेतून सावरणे सुरू होते आणि तो पहिल्या सामन्यापासूनच यष्टीरक्षण करेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. सॅमसन तंदुऊस्त नसल्यास ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून खेळू शकतो. फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविऊद्धच्या पाचव्या टी-20 दरम्यान फलंदाजी करताना जोफ्रा आर्चरचा चेंडू सॅमसनच्या बोटाला लागल्यानंतर जुरेलने सॅमसनच्या जागी यष्टीरक्षण केले होते.
गेल्या मोसमातील 16 सामन्यांमधील 15 डावांत सॅमसनने 48.27 च्या सरासरीने 153.46 च्या स्ट्राईक रेटसह 531 धावा केल्या केल्या होता. त्यात पाच अर्धशतके होती आणि 86 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या राहिली होती. दरम्यान, खांद्याच्या दुखापतीतून सावरलेला अष्टपैलू खेळाडू रियान परागलाही राजस्थानच्या संघात स्थान मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविऊद्धच्या टी-20 मालिकांतून बाहेर पडल्यानंतर परागने रणजी करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुनरागमन केले होते.









