सचिवपदी संतोष परब
सावंतवाडी : प्रतिनिधी
मडुरा येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संजू परब यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिवपदी संतोष परब यांची फेरनिवड झाली. सभेत नवरात्रोत्सवातील विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.मडुरा माऊली मंदिरात नवरात्रोत्सव मंडळाची सभा माजी अध्यक्ष दत्ताराम परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी देवस्थान उपसमिती अध्यक्ष आनंद परब, सचिव संतोष परब, खजिनदार सोमनाथ परब, उपसरपंच बाळू गावडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष जगन्नाथ परब, सोसायटी चेअरमन ज्ञानेश परब, माजी सरपंच नंदकिशोर परब, माजी अध्यक्ष नकुळ परब, दिलीप परब, अरुण परब, दिनेश परब, नारायण परब, भूषण परब, पोलिस पाटील नितीन नाईक आदींसह समिती सदस्य उपस्थित होते.सभेत नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांबाबत चर्चा झाली. दशावतार नाटके, भजने, गरबा नृत्ये, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, साऊंड सिस्टीम, महिलांसाठी पैठणी कार्यक्रम याबाबत नियोजन करण्यात आले. उपस्थितांचे आभार संतोष परब यांनी मानले.









