वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या प्रमुख कार्यकारीपदावर (सीईओ) भारताच्या संजोग गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसीचे अध्यक्षपद जय शहा सांभाळत असून त्यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये संजोग गुप्ता यांची प्रमुख कार्यकारी म्हणून निवड करण्यात आली. संजोग गुप्ता हे जिओ स्टारचे प्रमुख कार्यकारी म्हणून यापूर्वी कार्यरत होते.
आयसीसीमध्ये विविध पदांसाठी जागा रिक्त झाल्या असून नव्या व्यक्तींच्या नियुक्ती प्रक्रियेला गेल्या मार्चपासून प्रारंभ झाला आहे. आयसीसीच्या सीईओ पदासाठी 25 देशांतील सुमारे 2500 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये 12 उमेदवारांची अंतिम यादी निश्चत करण्यात आली होती. अखेर संजोग गुप्ता यांची या पदासाठी निवड करण्याचा निर्णय आयसीसीच्या कार्यकारिणी समितीने एकमताने घेतला.









