गोवा पोलिसांनी पुण्यात केली कारवाई
पणजी : धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याची तब्बल 5.10 कोटी ऊपयांची फसवणूक करणाऱ्या प्रदीप जामदार याला गोवा पोलिसांनी पुणे येथे अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेला प्रदीप जामदार हा पुण्यातील वाहतूक आस्थापनाचा मालक आहे. प्रदीप जामदार, काशिनाथ दहिवाल, सय्यद निजामली यांनी ऊस तोडणीसाठी मजुरांचा पुरवठा आणि ऊसाची कारखान्यात वाहतूक करण्यासाठी कंत्राट घेतले होते. त्यासाठी संजीवनीने 5 कोटी 10 लाख ऊपये जमादार याला दिले होते. तसा कारार ऑक्टोबर 2017 मध्ये झाला होता. तिघांनीही पैसे घेतले, मात्र काम केले नाही, त्यामुळे रु. 5.10 कोटी ऊपयांच्या फसवणूकप्रकरणी काल शुक्रवारी जामदार याला अटक करण्यात आली.









