अरिजीत-अंकित तिवारीने दिला गाण्याचा आवाज
अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री संजीदा शेख एकत्र झळकणार आहेत. या दोघांचे नवे गीत ‘तुम क्या हो’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या अल्ब्बमची घोषणा अंकित तिवारीने सोशल मीडियाद्वारे केली आहे.
या अल्बला केवळ अंकित तिवारी नव्हे तर अरिजीत सिंहने देखील आवाज दिला आहे. अरिजीत देखील या अल्बमध्ये गाण्यास तयार झाल्याचे अंकित तिवारीने सांगितले आहे. चित्रपटसृष्टीतील माझे मित्र जॉन अब्राहम आणि संजीदा लवकरच एका अल्बममध्ये दिसून येतील. तुम क्या हो हे गाणे प्रदर्शित झाले असल्याचे अंकितने म्हटले आहे.
या पोस्टवर अंकित तिवारी आणि अरिजीत सिंहसोबत जॉन आणि संजीदा शेखच्या चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. या गीताचे लेखन अभेंद्र कुमार उपाध्याय यांनी केले आहे. तर या गाण्याला सरमन जैन आणि प्रीत राजपूत यांनी दिग्दर्शित केले आहे.









