नवी दिल्ली
आप नेते संजय सिंह यांनी मंगळवारी दुसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. संजय सिंह हे सध्या दिल्ली अबकारी घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने मागील आठवड्यात तिहार तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना संजय सिंह यांना शपथग्रहणासाठी नेण्याची प्रक्रिया सुविधाजनक करण्याचा आदेश दिला होता. संजय सिंह यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ देण्यास यापूर्वी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीच नकार दिला होता.









